महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात हिटमॅन रोहितची धोनीच्या मोठ्या विक्रमाशी बरोबरी

टी-२० क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक सामने खेळणाऱ्या धोनीच्या विक्रमाची रोहितने बरोबरी केली आहे. धोनीने आत्तापर्यंत ९८ टी-२० सामने खेळले आहेत. त्याने २००६ मध्ये पहिला सामना खेळला होता. तर, २००७ मध्ये पदार्पण करणाऱ्या रोहितचाही हा ९८ वा टी-२० सामना होता.

आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात हिटमॅन रोहितने केली धोनीच्या मोठ्य़ा विक्रमाशी बरोबरी

By

Published : Sep 23, 2019, 10:38 AM IST

बंगळुरू -भारत आणि आफ्रिका यांच्यात झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात आफ्रिकेने भारताला पराभूत केले. या सामन्यात फक्त ९ धावांची खेळी करणाऱ्या रोहितने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या एका मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

हिटमॅन आणि माही

हेही वाचा -श्रीनिवासन यांच्या मुलीकडे दिले जाणार क्रिकेटमधील 'हे' मोठे पद

टी-२० क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक सामने खेळणाऱ्या धोनीच्या विक्रमाची रोहितने बरोबरी केली आहे. धोनीने आत्तापर्यंत ९८ टी-२० सामने खेळले आहेत. त्याने २००६ मध्ये पहिला सामना खेळला होता. तर, २००७ मध्ये पदार्पण करणाऱ्या रोहितचाही हा ९८ वा टी-२० सामना होता.

हिटमॅनने आत्तापर्यंत ९८ टी-२० सामन्यात ४ शतके आणि १७ अर्धशतकांसहित २४४३ धावा चोपल्या आहेत. तर, धोनीने २ शतकांसह १६१७ धावा केल्या आहेत. या दोघानंतर, सुरेश रैनाने ७८, विराटने ७३, युवराजने ५८ आणि शिखर धवनने ५६ सामने खेळले आहेत.

टी-२० मध्ये सर्वात जास्त सामने खेळण्याचा मान पाकिस्तानच्या शोएब मलिकच्या नावावर आहे. त्याने १११ सामने खेळले आहेत. त्यानंतर शाहिद आफ्रिदीने ९९ सामने खेळले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details