नवी दिल्ली -भारतीय क्रिकेटपटू आणि सलामीवीर रोहित शर्मा याने कोरोना व्हायरसच्या वाढत्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. रोहितने देशवासीयांना या घातक आजाराबद्दल सावध राहण्यास सांगितले आहे.
हेही वाचा -रणजीचा 'हिरो' जयदेव उनाडकटने कोरोनाच्या दहशतीत उरकला साखरपुडा
रोहितने आपल्या ट्विटर आणि फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट केला. 'गेले काही आठवडे आपल्यासाठी खूप कठीण होते. संपूर्ण जग यावेळी थांबले आहे, जे अत्यंत वाईट आहे. आपण सर्वजण एकत्र येऊन या आजाराशी लढत आहोत. थोडीशी सावधगिरी बाळगून आम्ही आपल्या सभोवतालची जागरूकता बाळगून ही लढाई लढू शकतो', असे रोहितने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
बीसीसीआयने कोरोनाच्या दहशतीमुळे २९ मार्चपासून सुरू होणारी इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला. यानंतर आता आठही संघाच्या फ्रेंचायझींनी आपले सराव सत्र रद्द केले आहेत.
दरम्यान, जगभरात कोरोनाचा फैलाव वाऱ्यासारखा होत आहे. या विषाणूने १०० हून अधिक देश ग्रासले आहेत. तर ६ हजाराहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतात आजघडीपर्यंत ११४ हून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर दोन जणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जगात १ लाख ६० हजाराहून अधिक लोकांना कोरोनाग्रस्त लोक आहेत.