दुबई - भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना भारताने १० गडी राखून जिंकला. या सामन्यात सलामीवीर रोहित शर्मा, फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल यांनी चांगली कामगिरी नोंदवली. त्यांच्या या दमदार कामगिरीचा फायदा त्यांना झाला आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या कसोटी क्रमवारीत त्यांना बढती मिळाली.
भारताचा सलामीवीर रोहित शर्माने आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत टॉप-१० मध्ये प्रवेश केला आहे. त्याला सहा स्थानांनी बढती मिळून तो आठव्या स्थानी विराजमान झाला. यादीत वरील ७ फलंदाजांच्या क्रमवारीत कोणताही बदल झालेला नाही. विराट पाचव्या स्थानी कायम आहे.