लंडन -द ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया या सामन्यात रोहित शर्माने 61 चेंडूत अर्धशतक झळकावले. यासह त्याने एक नवीन विक्रमही आपल्या नावे केलाय. या सामन्यात रोहितने 20 धावा करताच, तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वात वेगाने २ हजार धावा करणारा फलंदाज ठरला आहे. रोहितने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मागे सारत हा विक्रम आपल्या नावे केलाय.
मास्टर ब्लास्टर तेंडुलकरला मागे सारत रोहित शर्माने रचला इतिहास - world
वनडेमध्ये रोहितने आतापर्यंत 23 शतके झळकावली असून त्यापैकी 7 शतके ही त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केली आहेत.
रोहित शर्मा
सचिनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2 हजार धावा करण्यासाठी 40 डाव खेळले होते. तर रोहितने हा पराक्रम 37 डावामध्ये पूर्ण करत सचिनला मागे टाकले. या यादीत व्हीव रिचर्डस तिसऱ्या स्थानी असून त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 44 डावांमध्ये 2 हजार धावा पूर्ण केल्या होत्या.
वनडेमध्ये रोहितने आतापर्यंत 23 शतके झळकावली असून त्यापैकी 7 शतके ही त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केली आहेत.