महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

टी-२०त रोहित ९ हजारी मनसबदार; 'या' खेळाडूंनी केला कारनामा - टी-२० क्रिकेट रोहित शर्मा रन्स न्यूज

रोहित शर्माने टी-२० क्रिकेटमध्ये ९ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. रोहितने ३४२ टी-२० सामन्यात खेळताना हा टप्पा गाठला.

rohit sharma becomes-second-indian-after-kohli-to-cross-9000-t20-runs
टी-२०त रोहित ९ हजारी मनसबदार; 'या' खेळाडूंनी केला कारनामा

By

Published : Mar 18, 2021, 10:06 PM IST

अहमदाबाद - रोहित शर्माने टी-२० क्रिकेटमध्ये ९ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. रोहितने ३४२ टी-२० सामन्यात खेळताना हा टप्पा गाठला. यातील २ हजार ८०० धावा त्याने आंतराष्ट्रीय टी-२० सामन्यात केल्या आहेत.

रोहितला ९ हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी १२ धावांची गरज होती. त्याने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या सामन्यात खेळताना हा टप्पा गाठला. अशी कामगिरी करणारा तो भारताचा दुसरा तर जगातील नववा फलंदाज ठरला आहे. रोहितच्या आधी विराटने ही कामगिरी केली आहे. विराटच्या नावे ३०२ सामन्यात ९ हजार ६५० धावा आहेत.

टी-२० क्रिकेटमद्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम वेस्ट इंडीजचा डावखुरा फलंदाज ख्रिस गेलच्या नावे आहे. गेलने १३ हजार ७२० धावा केल्या आहेत. गेलनंतर या यादीत केरॉन पोलार्ड दुसऱ्या स्थानी असून त्याच्या नावे १० हजार ६२९ धावा आहेत. पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शोएब मलिक १० हजार ४८८ धावांसह तिसऱ्या स्थानी आहे. या यादीत न्यूझीलंडचा ब्रॅडन मॅक्युलम (९९२२), ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर (९८२४), अॅरोन फिंच (९७१८), विराट कोहली, आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स (९१११) यानंतर रोहितचा नंबर लागतो.

हेही वाचा -Ind vs Eng, ४th T२० : इंग्लंडसमोर विजयासाठी १८६ धावांचे लक्ष्य, सूर्याची अर्धशतकी खेळी

हेही वाचा -२२ वर्षीय गोलंदाजाने उडवली धोनी दांडी, पाहा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details