महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

दिल्लीविरुद्धच्या सामन्यात रोहितने नोंदवला खास विक्रम - Rohit sharma 150 ipl matches

रोहित १५० आयपीएल सामने खेळणारा मुंबई इंडियन्सचा दुसरा खेळाडू ठरला आहे. रोहितने २००८मध्ये आयपीएल कारकीर्दीची सुरुवात केली. सुरुवातीला तो डेक्कन चार्जस संघात होता. २००९मध्ये रोहितने या संघासह आयपीएलचे जेतेपदही जिंकले. २०११ मध्ये रोहित मुंबईत दाखल झाला.

Rohit sharma became the second player to play 150 ipl matches for mumbai
दिल्लीविरुद्धच्या सामन्यात रोहितने नोंदवला खास विक्रम

By

Published : Oct 12, 2020, 4:08 PM IST

अबुधाबी -मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने दिल्लीविरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरताच मोठी कामगिरी केली. रोहित १५० आयपीएल सामने खेळणारा मुंबई इंडियन्सचा दुसरा खेळाडू ठरला आहे. रोहितच्या आधी कायरन पोलार्डने मुंबईसाठी १५० सामने खेळले आहेत.

रोहितने २००८मध्ये आयपीएल कारकीर्दीची सुरुवात केली. सुरुवातीला तो डेक्कन चार्जस संघात होता. २००९मध्ये रोहितने या संघासह आयपीएलचे जेतेपदही जिंकले. २०११मध्ये रोहित मुंबईत दाखल झाला. २०१३मध्ये त्याने संघाचे नेतृत्व सांभाळले. त्याच्या नेतृत्वात मुंबईचे आयपीएलची चार विजेतेपदे जिंकली आहेत.

क्विंटन डी कॉक आणि सूर्यकुमार यादव या दोघांच्या चमकदार कामगिरीमुळे मुंबई इंडियन्सने पाच गडी आणि २ चेंडू राखून दिल्लीवर विजय मिळवला. शेवटच्या रोमहर्षक षटकात कृणाल पांड्याने दोन चौकार मारत सामना नावावर केला. या विजयामुळे मुंबई इंडियन्सने पुन्हा अव्वलस्थानी झेप घेतली आहे.

या सामन्यापूर्वी, रोहितने आतापर्यंत १९५ आयपीएल सामन्यात १३१ च्या स्ट्राईक रेटने आणि ३१.७३ च्या सरासरीने ५ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. रोहितची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या १०९ आहे. त्याने आतापर्यंत ३८ अर्धशतके आणि १ शतक ठोकले आहे. याशिवाय त्याने ४४६ चौकार आणि २०८ षटकार खेचले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details