मोहाली- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील शेवटच्या २ सामन्यांसाठी महेंद्रसिंह धोनीच्या जागी ऋषभ पंतचा संघात समावेश करण्यात आला आहे. चौथ्या सामन्यात ऋषभने फलंदाजी चांगली केली. परंतु, त्याने यष्टीरक्षणात केलेल्या चुकांमुळे भारताला सामना गमवावा लागला.
मैदानातील प्रेक्षकांनी पंतचे ढिसाळ यष्टीरक्षण पाहून धोनी धोनीचा गजर केला. ऑस्ट्रेलियासाठी सामना जिंकून देणाऱ्या अॅश्टन टर्नरला बाद करण्याची चांगली संधी भारताकडे होती. युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर लेग स्टंपकडे जाणारा चेंडू टर्नरला खेळता आला नाही. यादरम्यान टर्नरला यष्टीचित करण्याची चांगली संधी पंतकडे होती. परंतु, पंतला चेंडू व्यवस्थित पकडता आला नाही. टर्नरने या जीवनदानाचा चांगलाच फायदा उचलताना ४३ चेंडूत ८४ धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाला ४ गड्यांनी सामना जिंकून दिला.सामना हरल्यामुळे सोशल मीडियावरही पंतची यष्टीरक्षणासाठी खिल्ली उडवण्यात आली.
पंतच्या यष्टीरक्षणाची खिल्ली उडवताना उमटलेल्या प्रतिक्रिया