मुंबई- कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी संपूर्ण देश २१ दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे. भारतीय खेळाडू यामुळे आपापल्या घरी कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहे. पण, खेळाडू सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी जोडले गेले आहेत. भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा आणि भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांनी इन्स्टाग्रामवर लाईव्ह चॅट केले. यात त्यांनी आयपीएल संदर्भात संघाच्या गेमप्लानबद्दल चर्चा केली तसेच मजेशीर गप्पाही मारल्या. त्यांच्या या लाईव्ह चॅटचा चाहत्यांनाही आनंद लुटला.
लाईव्ह चॅटदरम्यान, बुमराहने रोहितला सांगितले की, ऋषभ पंत तुला सर्वात लांब षटकार ठोकण्यासाठी आव्हान देऊ इच्छित आहे. यावर रोहित म्हणाला, त्याला माझ्यासोबत हे करायचयं.. संघात येऊन एक वर्ष झाले नाही आणि तो मला षटकारसाठी आव्हान देत आहे. पंगा क्यू ले रहा है चूपचाप बैठ ना.' रोहितचे हे उत्तर ऐकून बुमराहला हसू अनावर झाले.