महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 24, 2019, 7:24 PM IST

ETV Bharat / sports

फिरकी गोलंदाजीवर ऑस्ट्रेलियाचे भवितव्य अवलंबून - पाँटिंग

संघाची फलंदाजी ही फिरकीला कशा प्रकारे सामोरी जाते यावर ऑस्ट्रेलियाचे यश ठरणार असल्याचे त्याने नमूद केले

रिकी पाँटिंग

लंडन -आगामी विश्वकरंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे यश फिरकी गोलंदाजीवर अवलंबून असेल, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने व्यक्त केले आहे. तसेच संघाची फलंदाजी ही फिरकीला कशा प्रकारे सामोरी जाते यावर ऑस्ट्रेलियाचे यश ठरणार असल्याचे त्याने नमूद केले.

एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार पाँटिगने संघातल्या फिरकी गोलंदाजांविषयीचे मत व्यक्त केले. अॅडम झाम्पा चांगली गोलंदाजी करत असून नॅथन लियॉन सारखा फिरकीपटूही संघात आहे. गरज पडल्यास मॅक्सवेलसुद्धा गोलंदाजीला उपयुक्त ठरू शकतो, असे पाँटिगने सांगितले.

ऑस्ट्रेलिया

डेव्हिड वॅार्नर आणि स्टीव स्मिथ यांच्या पुनरागमनामुळे संघाची मध्यमफळी अधिक मजबूत झाली आहे. त्यामुळे जुने वाद विसरून ते विश्वकरंडक स्पर्धेत चांगली कामगिरी बजावतील, असा विश्वास पाँटिंगने व्यक्त केला.
आपल्या कर्णधारपदाच्या काळात संघाला 2 वेळा विश्वकरंडक मिळवून देणारा रिकी पाँटिंग आता येत्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा सहायक प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details