किंग्स्टन -भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला प्रतिष्ठित अर्जुन पुरस्कार मिळाला. सध्या जडेजा विंडीज दौऱ्यावर व्यग्र असल्याने त्याला या पुरस्कार सोहळ्याला हजर राहता आले नाही. त्यामुळे त्याने एका व्हिडीओद्वारे भारत सरकारचे आभार मानले आहेत.
जडेजा म्हणाला, 'सर्वात प्रथम अर्जुन पुरस्काराने सन्मानित केल्यामुळे मी भारत सरकारचे आभार मानतो. पुरस्कारप्राप्त सर्व खेळाडूंचे मी अभिनंदन करतो. त्यांनी शानदार प्रदर्शन केले आहे.' बीसीसीआयने जडेजाचा हा व्हिडीओ ट्विटरवरुन शेअर केला आहे.