मुंबई - भारतीय संघाच्या चाहत्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने सरावाला सुरूवात केली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जडेजाला दुखापत झाली होती. यातून तो आता सावरला आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील सिडनी कसोटीदरम्यान, जडेजाच्या अंगठ्याला दुखापत झाली. यामुळे तो उर्वरित मालिकेतून बाहेर पडला होता. त्यानंतर तो इंग्लंडविरुद्धच्या मालिकेलाही मुकला.
जडेजावर बंगळुरू येथील राष्ट्रीय अकादमीमध्ये उपचार सुरू होते. उपचारानंतर जडेजाने सरावाला सुरूवात केली आहे. दरम्यान, जडेजा इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात पुनरागमन करू शकतो. भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेला २३ मार्चपासून सुरूवात होणार आहे.