नवी दिल्ली -आयपीएलमध्ये केलेल्या मंकडिंगचा फोटो शेअर करत भारताचा फिरकीपटू अश्विनने भारतीयांना घरीच राहण्याची सूचना केली आहे. कोरोनामुळे भारत सध्या २१ दिवस लॉकडाउन आहे. आयपीएलच्या गेल्या हंगामात पंजाबकडून खेळणाऱ्या अश्विनने राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरला मंकडिंग पद्धतीने बाद केले होते.
मजेदार फोटो शेअर करत अश्विनचे भारतीयांना घरी राहण्याचे आवाहन - ravichandran ashwin latest news
‘बाहेर न येण्याची आठवण करून देण्यासाठी हा चांगला फोटो आहे. आतच रहा. सुरक्षित रहा’, असे अश्विनने आपल्या ट्विटच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यासह इतर खेळाडूंनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 21 दिवसांच्या लॉकडाऊनला पाठिंबा दर्शवला.
‘बाहेर न येण्याची आठवण करून देण्यासाठी हा चांगला फोटो आहे. आतच रहा. सुरक्षित रहा’, असे अश्विनने आपल्या ट्विटच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यासह इतर खेळाडूंनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 21 दिवसांच्या लॉकडाऊनला पाठिंबा दर्शवला. तसेच लोकांना घरात राहण्याचे आवाहन केले.
कोरोना व्हायरसने भारतात प्रचंड कहर सुरू ठेवला आहे. या व्हायरसची बुधवारी देशात 95 नवीन प्रकरणे नोंदली गेली. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, बुधवारी संक्रमित लोकांची संख्या ६००पार पोहोचली आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत भारतात १७ जणांचा बळी गेला आहे.