नवी दिल्ली - भारतीय फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने ट्विटरवर एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये काही मुले क्रिकेट खेळताना दिसत असून या मुलांनी डिसिजन रीव्यू सिस्टमला (डीआरएस) एका वेगळ्या पध्दतीने प्रदर्शित केले आहे.
या मजेशीर व्हिडिओमध्ये मुले गल्ली क्रिकेट खेळत आहेत. गोलंदाजाच्या अपीलनंतर पंच फलंदाजाला बाद घोषित करतो. तोपर्यंत फलंदाज डीआरएसचा वापर करतो. मात्र, इथे तंत्रज्ञानाचा वापर न करता मुलांनी खास प्रकारे डीआरएसचा उपयोग केला आहे.