महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

शास्त्रींकडून गांधी जयंतीच्या शुभेच्छा, नेटकऱ्यांनी 'ड्राय डे' म्हणत घेतली फिरकी - शास्त्रींकडून गांधी जयंतीच्या शुभेच्छा

व्हिडिओद्वारे शास्त्रींनी 'फिट इंडिया' आणि 'स्वच्छ भारत' या दोन्ही अभियानात चाहत्यांना सहभागी होण्यास सांगितले. मात्र, नेटकऱयांनी शास्त्रींनाच आज 'ड्राय डे' आहे म्हणत ट्रोल केले आहे.

शास्त्रींकडून गांधी जयंतीच्या शुभेच्छा, नेटकऱ्यांनी 'ड्राय डे' म्हणत घेतली फिरकी

By

Published : Oct 2, 2019, 10:05 AM IST

विशाखापट्टणम -आज जगभरामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधीची १५० वी जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. देशभरामध्येही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्त टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये त्यांनी लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोहिमेत सामील होण्याचे आवाहन केले. मात्र, नेटकऱ्यांनी त्यांचीच फिरकी घेतली आहे.

हेही वाचा -सचिन, सेहवागच्या 'त्या' विक्रमाच्या पंक्तीत विराटला बसण्याची संधी

या व्हिडिओद्वारे शास्त्रींनी 'फिट इंडिया' आणि 'स्वच्छ भारत' या दोन्ही अभियानात चाहत्यांना सहभागी होण्यास सांगितले. मात्र, नेटकऱयांनी शास्त्रींनाच आज 'ड्राय डे' आहे म्हणत ट्रोल केले आहे. शास्त्रींच्या ट्विटला चाहत्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया -

आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत बरोबरी राखल्यानंतर, आज भारतीय संघाने आपल्या कसोटीच्या अभियानाला सुरुवात केली आहे. विशाखापट्टणम येथील एसीए-वीडीसीए स्टेडियमवर भारताने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तीन सामन्याच्या या कसोटी मालिकेत आघाडी घेण्याचा दोन्ही संघांचा मानस असणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details