महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

..असा विक्रम करणारा राशिद खान पहिलाच कर्णधार - शाकिब अल हसन

२० वर्षीय फिरकीपटू राशिद खान हा कसोटी क्रिकेटमधील सर्वात युवा कर्णधार ठरला आहे. बांगलादेशच्या शाकिब अल हसननेही युवा कर्णधारपद सांभाळले होते. राशिदने २० वर्ष आणि ३५२ दिवसांत हा पराक्रम केला तर शाकिबने २२ वर्ष आणि ११५ दिवसात हा विक्रम केला होता.

..असा विक्रम करणारा राशिद खान पहिलाच कर्णधार

By

Published : Sep 8, 2019, 9:59 AM IST

नवी दिल्ली - कसोटीमध्ये नवीन असलेल्या अफगाणिस्तानने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तिसऱ्या दिवसअखेर अफगाणिस्तानने ८ गड्यांच्या मोबदल्यात २३७ धावा केल्या आहेत. त्यामुळे अफगाणिस्तानकडे आता ३७४ धावांची भक्कम आघाडी आहे. या कसोटीत कर्णधार राशिद खानने एक खास विक्रम करत बांगलादेशच्या शाकिबला मागे टाकले आहे.

हेही वाचा -रहमत शाह ठरला अफगाणिस्तानचा पहिला 'शतकवीर'

२० वर्षीय फिरकीपटू राशिद खान हा कसोटी क्रिकेटमधील सर्वात युवा कर्णधार ठरला आहे. बांगलादेशच्या शाकिब अल हसननेही युवा कर्णधारपद सांभाळले होते. राशिदने २० वर्ष आणि ३५२ दिवसांत हा पराक्रम केला तर शाकिबने २२ वर्ष आणि ११५ दिवसात हा विक्रम केला होता.

याशिवाय, एकाच डावात ५ विकेट आणि ५० धावा करणारा राशिद जगातील चौथा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याच्या आधी इंग्लंडचा माजी कर्णधार शेल्डन जॅक्सन आणि पाकिस्तानचा दिग्गज इमरान खान आणि बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन यांनी ही कामगिरी बजावली होती.

अफगाणिस्तान वि. बांगलादेश धावफलक -

  • अफगाणिस्तान (पहिला डाव) - ३४२/१०
  • बांगलादेश (पहिला डाव) - २०५/१०
  • अफगाणिस्तान (दुसरा डाव) - २३७/८*

ABOUT THE AUTHOR

...view details