कराची- पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने, भारत-पाकिस्तान यांच्यात मालिका खेळवून, या मालिकेतून मिळणारे उत्पन्नाचा वापर, कोरोना लढ्यात करावा, असा पर्याय सुचवला आहे. शोएबच्या या पर्यायाला पाकिस्तानचे माजी खेळाडू रमीज राजा यांनी देखील पाठिंबा दर्शवला आहे.
रमीज राजा म्हणाले, भारत-पाकिस्तान सामन्याला चाहत्यांची चांगली पसंती मिळतो. २०१९ च्या विश्वविश्वकरंडक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामना सुपर हिट ठरला. या सामन्याला सर्वाधिक प्रेक्षकांची उपस्थिती होती. लाईव्ह देखील हा सामना सर्वाधिक पाहिला गेला. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या भारत-पाकिस्तान सामने व्हायला हवेत. चाहत्यांनीच आता भारत-पाक सामने तटस्थ ठिकाणी खेळवायचा आग्रह धरायला हवा.'
भारत-पाकिस्तानमध्ये क्रिकेटमुळे इतका तणाव का असतो माहित नाही. आपण क्रिकेटच्या माध्यमातून एकमेकांना जाणून घेऊ शकतो, असेही रमीज राजा म्हणाले. दरम्यान, शोएबने कोरोना लढ्याच्या मदतनिधीसाठी भारत-पाकिस्तान यांच्यात मालिका खेळवण्याचा पर्याय सुचवला आहे. त्यांच्या या पर्यायावर कपिल यांनी भारताला निधीसाठी क्रिकेट खेळवण्याची गरज नाही, तर मदनलाल यांनी क्रिकेटचा निर्णय केंद्र सरकार घेईल, असे म्हटले आहे.