नवी दिल्ली -आयपीएल संघ राजस्थान रॉयल्सने लीगच्या आगामी हंगामासाठी आपला माजी कर्णधार ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्नची ब्रँड अॅम्बेसेडर आणि मार्गदर्शक म्हणून नेमणूक केली आहे. फ्रेंचायझीने रविवारी निवेदन प्रसिद्ध करून यासंदर्भात माहिती दिली.
फिरकीच्या जादुगाराची राजस्थान रॉयल्समध्ये पुन्हा 'एन्ट्री'
कोरोनामुळे यावेळी आयपीएलचे आयोजन संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) होत आहे. आयपीएलच्या तेराव्या पर्वासाठी राजस्थान रॉयल्सने आपला माजी कर्णधार ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्नची ब्रँड अॅम्बेसेडर आणि मार्गदर्शक म्हणून नेमणूक केली आहे.
एक सल्लागार म्हणून वॉर्न मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅक्डोनाल्डबरोबर काम करेल. शिवाय, वॉर्न राजस्थानच्या व्यवस्थापनासह आंतरराष्ट्रीय फॅनबेस मजबूत करण्यासाठी प्रयत्न करेल. आपल्या दुहेरी भूमिकेबद्दल वॉर्न म्हणाला, "राजस्थानबरोबर पुन्हा जोडलो गेल्याने चांगले झाले आहे. हा माझा संघ आणि कुटुंब आहे. फ्रेंचायझीसह सर्व क्षेत्रात कार्य करणे चांगले होईल. आम्ही जागतिक स्तरावर एक चांगला संघ होण्यासाठी काम केले, आहे. या हंगामात: अँड्र्यू मॅकडोनाल्ड आणि झुबिन बारुचा यांच्यासोबत मी संघाबरोबर जोडलो गेल्याने मला आनंद झाला आहे. मला आशा आहे, की आमचा हंगाम यशस्वी होईल आणि येत्या काही महिन्यांत आम्ही चांगले यश मिळवू शकू."
कोरोनामुळे यावेळी आयपीएलचे आयोजन संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) होत आहे. दुबई, अबू धाबी आणि शारजाह ही तीन यूएई शहरे १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत लीगचे आयोजन करतील. गतविजेत्या मुंबईचा आणि लीगचा पहिला सामना १९ नोव्हेंबरला चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध होईल.