राजस्थान रॉयल्सचा संघ या वर्षी दिसणार नव्या रंगात - IPL
स्टीव्ह स्मिथ, बेन स्टोक्स आणि जोस बटलर यांसारखे स्टार खेळाडूंच्या उपस्थितीत झाले नव्या जर्सीचे अनावरण
rajasthan royals
जयपूर -राजस्थान रॉसल्सचा संघ आयपीएलच्या बाराव्या हंगामात गुलाबी रंगात रंगलेला दिसणार आहे. यावेळी राजस्थान संघाने आपल्या जर्सीसाठी जयपूरचा पारंपरिक गुलाबी रंग निवडला आहे.
राजस्थानचा संघ आजवर सर्व सत्रात रॉयल ब्ल्यू रंग असलेली जर्सी घालून खेळला. मात्र, यावेळी संघाने आपल्या जर्सीच्या रंगात बदल केला आहे. यापूर्वी राजस्थानचे खेळाडू फक्त सराव करताना गुलाबी जर्सी वापरत असे. मात्र, आता सामना खेळतानाही राजस्थानचे खेळाडू गुलाबी जर्सीत दिसणार आहेत.
नव्या जर्सीचे अनावरण केले त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ, बेन स्टोक्स आणि जोस बटलर यांसारखे स्टार खेळाडू उपस्थित होते. तसेच भारताचे जयदेव उनाडकट आणि संजू सॅमसनही यावेळी हजर होते. मात्र, कर्णधार अजिंक्य रहाणे यावेळी काही कारणास्तव उपस्थित राहू शकला नव्हता. राजस्थान रॉयल्सचा पहिला सामना हा 25 मार्चला किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध होणार आहे.
राजस्थान रॉयल्सचा संघ
अजिंक्य रहाणे (कर्णधार), कृष्णप्पा गॉथम, संजू सॅमसन, श्रेयस गोपाळ, आर्यमान बिर्ला, एस मिथून, प्रशांत चोप्रा, स्टुअर्ट बिन्नी, राहुल त्रिपाठी, धवल कुलकर्णी, महिपाल लोमरोर, बेन स्टोक्स, स्टीव्ह स्मिथ, जॉस बटलर, जोफ्रा आर्चर, इश सोधी, जयदेव उनाडकट, वरुण ऍरॉन, ओशान थॉमस, शशांक सिंग, लियाम लिव्हिनस्टोन, शुभम राजाने, मनन वोहरा, ऍश्टन टर्नर, रियान पराग.