नवी दिल्ली - रवी शास्त्री टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी पार पाडत असताना भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड चक्क १६ देशांच्या खेळाडूंना प्रशिक्षण देणार आहे. याबाबतीत रवी शास्त्री टीम इंडियाचे 'गुरू' ठरले असताना तर, द्रविड 'सुपर गुरू' ठरला आहे.
बीसीसीआयच्या वतीने भारतात इतर १६ देशांच्या युवा खेळाडूंना क्रिकेटचे धडे देण्यात येणार आहेत. भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडने भारतीय अंडर-१९ संघाला आणि भारतीय अ संघाला प्रशिक्षण दिले आहे. यामुळे 'सुपर गुरू' म्हणून राहुल द्रविडची निवड करण्यात आली आहे. लंडनमध्ये भारत सरकाराने कॉमवेल्थ बैठकीत हा निर्णय घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१८ मध्ये १६ देशांच्या मुला-मुलींना भारतात क्रिकेट ट्रेनिंगसाठी आमंत्रित केले होते. बंगळुरू येथे पुढच्या वर्षी १ ते ३० ऑक्टोबर दरम्यान हे प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहे. महत्वाचे म्हणजे, या मुला-मुलींच्या राहण्याची तसेच, ट्रेनिंग कँपची सुविधा भारत सरकार करणार आहे.