मुंबई - भारतीय 'अ' संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड याने फॉर्मात नसलेल्या के.एल. राहुलवर विश्वास दाखविला आहे. के.एल. राहुलला कॉफी विद करण या कार्यक्रमात वादग्रस्त टिपण्णी केल्यानंतर भारतीय संघातून काढून टाकले होते. त्यानंतर त्याला परत मायदेशी बोलावून घेतले आहे. भारत अ संघाकडून खेळताना त्याने ३ सामन्यात १३, ४२ आणि ० धावा काढल्या आहेत.
के.एल. राहुलच्या कार्यक्षमतेवर माझा पूर्ण विश्वास - द्रविड - cricketer
इंग्लंडमध्ये १९९९ साली झालेल्या विश्वचषकात ४६१ धावा काढणाऱ्या राहुल द्रविड भारतीय संघाबद्दल बोलताना म्हणाला, की भारतीय संघ सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करेल. तो विजयाचा प्रबळ दावेदार म्हणून स्पर्धेत उतरेल.
द्रविड म्हणाला, की लोकेशच्या कार्यक्षमतेवर माझा पूर्ण विश्वास आहे. इंग्लंड लॉयन्स संघाविरुद्ध तो चार दिवसीय सामन्यात खेळणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात त्याने शतक ठोकले आहे. असा विक्रम फार कमी खेळाडू करतात. मला त्याच्या फॉर्माबद्दल कुठलीच चिंता नाही. तो लवकरच लय प्राप्त करेल, अशी आशा व्यक्त केली आहे.
इंग्लंडमध्ये १९९९ साली झालेल्या विश्वचषकात ४६१ धावा काढणाऱ्या राहुल द्रविड भारतीय संघाबद्दल बोलताना म्हणाला, की भारतीय संघ सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करेल. तो विजयाचा प्रबळ दावेदार म्हणून स्पर्धेत उतरेल. विश्वचषकात सर्व खेळपट्ट्या सपाट पाहायला मिळतील. त्यामुळे तिथे ३०० पेक्षा जास्त धावा होतील असे द्रविड म्हणाला.