महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

द्रविड बाबतीत झालेल्या चूकीवर नेटीझन्स आयसीसीला म्हणाले, तुम्ही नशेत आहात का?

राहुल द्रविडला हॉल ऑफ फेममध्ये जागा मिळाली. त्यानंतर राहुल द्रविड याची नोंद आयसीसीच्य संकेतस्थळावर करण्यात आली. यामध्ये आयसीसीच्या व्यवस्थापनाने राहुल द्रविडची डावखुरा फलंदाज अशी नोंद केली. यानंतर भडकलेल्या नेटीझन्सनीं आयसीसीला तुम्ही नशेत आहात का ? अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या.

आयसीसीला द्रविड बद्दल चूक भोवली, नेटीझन्सनी विचारले..आयसीसी, तुम्ही नशेत आहात का?

By

Published : Sep 21, 2019, 9:35 PM IST

Updated : Sep 21, 2019, 11:32 PM IST

नवी दिल्ली - 'द वॉल' नावाने जगभरात प्रसिध्द असलेला भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड याचा आयसीसीच्या 'हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश करण्यात आला. पण, आयसीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर याची नोंद करताना मात्र, आयसीसीच्या व्यवस्थापनाने एक मोठी चूक केली. त्या चूकीमुळे नेटिझन्सनी आयसीसीचा समाचार घेतला.

राहुल द्रविड याला १ नोव्हेंबर २०१८ मध्ये हॉल ऑफ फेममध्ये जागा मिळाली. यानंतर भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावस्कर यांच्या हस्ते राहुल द्रविडचा सन्मान करण्यात आला. मात्र, आयसीसीने एक चूक केली. या चूकीवरुन नेटीझन्सनी आयसीसीवर कडाडून टीका केली.

नेमकं काय केलं आयसीसीने -
राहुल द्रविडला हॉल ऑफ फेममध्ये जागा मिळाली. त्यानंतर राहुल द्रविड याची नोंद आयसीसीच्य संकेतस्थळावर करण्यात आली. यामध्ये आयसीसीच्या व्यवस्थापनाने राहुल द्रविडची नोंद डावखुरा फलंदाज अशी केली. यानंतर भडकलेल्या नेटीझन्सनीं आयसीसीला तुम्ही नशेत आहात का ? अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या.

दरम्यान, राहुल द्रविड हा भारताचा भरवशाचा फलंदाज म्हणून ओळखला जातो. त्याने आपल्या अनेक दमदार खेळीने भारताला विजय मिळवून दिला आहे. द्रविडने कसोटी कारकिर्दीत १३ हजारांहून अधिक आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये १० हजारांहून अधिक धावा केल्या. कसोटी त्याने ५ द्विशतके ठोकली आहेत.

Last Updated : Sep 21, 2019, 11:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details