नवी दिल्ली -भारताचा अनुभवी ऑफस्पिनर रवीचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. अश्विन म्हणाला, ''नुकत्यात पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये सिडनीतील हॉटेलमध्ये असताना आमच्यासोबत एक वेगळी घटना घडली. या हॉटेलच्या लिफ्टमध्ये भारतीय खेळाडूंना ऑस्ट्रेलिया खेळाडूंसोबत जाऊ दिले नाही.'' भारतीय संघाचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर. श्रीधर यांच्यासोबत अश्विनने यूट्यूब चॅनेलवर चर्चा केली. या संवादादरम्यान अश्विनने या घटनेचा उलगडा केला.
हेही वाचा - धक्कादायक..! विमान अपघातात ४ फुटबॉलपटूंचा मृत्यू
संभाषणादरम्यान अश्विन म्हणाला, "सिडनी गाठल्यानंतर त्यांनी कडक निर्बंध घालून आम्हाला बंद केले. सिडनी येथे एक अनोखी घटना घडली. दोन्ही संघांचे खेळाडू एकाच जैव सुरक्षित वातावरणात होते. पण, जेव्हा ऑस्ट्रेलियाचे खेळाडू लिफ्टमध्ये होते, तेव्हा आम्हाला लिफ्टमध्ये जाण्यापासून थांबवण्यात आले. हे विचित्र होते. खरोखर, आम्हाला त्या वेळी वाईट वाटले. आमच्यासाठी ही गोष्ट पचवणे खूप कठीण होते."