नवी दिल्ली - फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला त्याच्या पत्नीने चांगलाच धक्का दिला आहे. अश्विनच्या पत्नीने त्याच्या आवडत्या अभिनेत्रीसोबत एक फोटो शेअर केला होता. या फोटोवर अश्विन भडकला आहे.
हेही वाचा -'दंगल गर्ल'ने दिली गोड बातमी दिली, लवकरच होणार आई
अश्विनची पत्नी प्रिथीने दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णनचा फोटो शेअर केला. यात प्रिथीने अश्विनला चिडवण्यासाठी टॅग केले. त्यामुळे अश्विन म्हणाला की, 'हे सर्व थांबव, मला सहन होत नाही.' शालेय वयात असल्यापासून अश्विन त्रिशाचा चाहता आहे. त्याने त्यावेळी या अभिनेत्रीसाठी एक फॅन क्लब सुरु केल्याचे एका मुलाखतीत म्हटले होते. त्यामुळे अश्विन चिडला आहे.