महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

पुजाराने ठोकले ५०वे शतक!.. दिग्गजांच्या यादीत मिळवले स्थान

याआधी, सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर आणि राहुल द्रविडने असा कारनामा केला आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सचिनच्या नावावर ८१ तर, द्रविडच्या नावावर ६८ शतके जमा आहेत. या विक्रमाची आंतरराष्ट्रीय यादी सांगायची झाली तर, पुजारा हा चौथा क्रिकेटपटू ठरला.

pujara hit 50th first class century joins sachin and dravid
पुजाराने ठोकले ५०वे शतक!.. दिग्गजांच्या यादीत मिळवले स्थान

By

Published : Jan 12, 2020, 10:25 AM IST

राजकोट -भारतीय कसोटी संघाचा भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजाराने यंदाच्या रणजी स्पर्धेत इतिहास घडवला. कर्नाटकविरुद्धच्या सामन्यात त्याने सौराष्ट्रकडून खेळताना प्रथम श्रेणी कारकीर्दीतील ५०वे शतक ठोकले. या विक्रमामुळे त्याने दिग्गज खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवले.

हेही वाचा -पांड्या फिटनेस टेस्टमध्ये 'नापास', न्यूझीलंड दौऱ्यासाठी 'या' अष्टपैलू खेळाडूची निवड

याआधी, सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर आणि राहुल द्रविडने असा कारनामा केला आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सचिनच्या नावावर ८१ तर, द्रविडच्या नावावर ६८ शतके जमा आहेत. या विक्रमाची आंतरराष्ट्रीय यादी सांगायची झाली तर, पुजारा हा चौथा क्रिकेटपटू ठरला. इंग्लंडचा अलिस्टर कुक (६५), भारताचा वसिम जाफर (५७), आणि हशिम अमला (५२) या विक्रमात आघाडीवर आहेत.

सौराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात खेळवल्या जाणाऱया सामन्यात पुजारा १६२ धावांवर नाबाद असून पहिल्या दिवशी सौराष्ट्राच्या संघाने २ बाद २९६ धावा जमवल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details