महाराष्ट्र

maharashtra

पाकिस्तानला मोठा धक्का!...पीएसएल स्थगित

By

Published : Mar 17, 2020, 2:59 PM IST

बाद फेरीतील सामना शिल्लक असताना ही स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. पीएसएलचे बाद फेरीचे सामने लाहोरमध्ये खेळले जाणार होते. परंतू, बुधवारच्या अंतिम सामन्यासह उर्वरित सामने रद्द करण्यात आले आहेत.

PSL 2020 has been postponed as a COVID-19 precaution.
पाकिस्तानला मोठा धक्का!...पीएसएल स्थगित

कराची - कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला जखडून घेतले आहे. क्रीडाक्षेत्रातही या व्हायरसने धूमाकुळ घातला असून अनेक नामवंत खेळाडू या व्हायरसच्या विळख्यात अडकले आहेत. शिवाय, अनेक महत्वाच्या स्पर्धाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अशातच, अंतिम टप्प्यात असलेली पाकिस्तान सुपर लीगही(पीएसएल) स्थगित करण्यात आली आहे.

हेही वाचा -इंन्स्टाग्रामवर जोफ्रा आर्चरचा रंगावरून अपमान, शेअर केला 'स्क्रीनशॉट'

बाद फेरीतील सामना शिल्लक असताना ही स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. पीएसएलचे बाद फेरीचे सामने लाहोरमध्ये खेळले जाणार होते. परंतू, बुधवारच्या अंतिम सामन्यासह उर्वरित सामने रद्द करण्यात आले आहेत. पाकिस्तान सुपर लीग या स्पर्धेची साखळी फेरी पूर्ण झाली होती. साखळी फेरीतून मुलतान टायगर्स, पेशावर झल्मी, लाहोर कलंदर्स आणि कराची किंग्स हे चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले होते. १७ मार्चला या स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढती खेळवल्या जाणार होत्या, तर अंतिम सामना १८ मार्चला होणार होता. पीएसएलमधील अनेक खेळाडूही कोरोनाच्या धसक्यामुळे माघारी परतले आहेत.

आयपीएलही पुढे -

बीसीसीआयने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेला १५ एप्रिलपर्यंत स्थगिती दिली आहे. यापूर्वी ही स्पर्धा २९ मार्चपासून सुरू होणार होती. कोरोनो व्हायरसमुळे आयपीएलचा १३ वा हंगाम पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details