नवी दिल्ली -कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर पहिल्यांदा भारत आणि बांगलादेश संघात ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना २२ नोव्हेंबर पासून सुरू होणार असून गुलाबी चेंडूच्या वापराबाबत खेळाडू आणि चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता लागली आहे.
गुलाबी चेंडू 'रिव्हर्स स्विंग' होण्यासाठी करण्यात आलाय 'हा' उपाय - पिंक बॉल रिव्हर्स स्विंग न्यूज
सामन्यावेळी हा गुलाबी चेंडू कोणत्या प्रकारे स्विंग होतो आणि कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात महत्वाचा फंडा असलेला 'रिव्हर्स स्विंग' प्रकार या चेंडूमुळे कितपत उपयोगात येतो, हे पाहणेदेखील महत्वाचे ठरणार आहे. एका मीडियासंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, रिव्हर्स स्विंगचा वापर होण्यासाठी हा गुलाबी बॉल हाताने शिवला गेला आहे, तो रिव्हर्स स्विंगसाठी उपयुक्त ठरू शकेल.

गुलाबी चेंडू तयार करण्यास सुमारे सात ते आठ दिवस लागतात आणि त्यानंतर त्यावर 'गुलाबी' आवरण लावले जातो. एकदा चामडे तयार झाल्यानंतर त्याचे तुकडे केले जातात जे नंतर चेंडूला झाकतात. क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत ११ दिवस-रात्र कसोटी खेळवण्यात आले आहेत. पण भारत आणि बांगलादेशने आतापर्यंत एकही दिवस-रात्र कसोटी सामना खेळलेला नाही.
सुमारे साडेचार वर्षांपूर्वी पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळवण्यात आला होता. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडदरम्यान अॅडलेड मैदानावर हा सामना झाला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ३ गडी राखून विजय मिळवला होता.