बंगळुरू - ऑस्ट्रेलिया संघाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिंसने भारताचा हुकमी गोलंदाज जसप्रीत बुमराहवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. कमिंस म्हणाला, की बुमराह त्याचा अचूक टप्पा आणि वेग यामुळे क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात खतरनाक गोलंदाज असून सध्याच्या घडीला तो जागतिक क्रिकेटमध्ये फलंदाजाना आव्हान देत आहे.
INDvAUS: ऑस्ट्रेलियाचा 'हा' खेळाडू झाला बुमराहचा फॅन - pat cummins
कमिंस पुढे बोलताना म्हणाला की बुमराह त्याच्याकडे असणाऱ्या पर्यायाचा मैदानात चांगल्या प्रकारे वापर करतो. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात तो चांगली गोलंदाजी करुन संघाला मदत करत आहे.
जसप्रीत बुमराह
कमिंस पुढे बोलताना म्हणाला की बुमराह त्याच्याकडे असणाऱ्या पर्यायाचा मैदानात चांगल्या प्रकारे वापर करतो. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात तो चांगली गोलंदाजी करुन संघाला मदत करत आहे.
रविवारी झालेल्या सामन्यात कमिंसने २ चेंडूवर चौकार आणि २ धावा घेऊन ऑस्ट्रेलियास विजय मिळवून दिला होता. कमिंसने भारताविरुद्धच्या मालिकेत भेदक मारा केला होता. तरीही ऑस्ट्रेलियाला पराभवास सामोरे जावे लागले. कमिंस स्वत:च्या गोलंदाजीवर जाम खूश आहे.