महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

श्रीलंका आणि बांगलादेश विरुध्द भारत मुद्दाम हरणार; पाकिस्तानच्या माजी खेळाडूचा आरोप - sri lanka

पाकिस्तानचा संघ उपांत्य फेरी गाठू नये, यासाठी भारत मुद्दाम श्रीलंका आणि बांगलादेश विरुध्दचे सामने हरणार असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बासित अली यांनी केला आहे.

भारत श्रीलंका आणि बांगलादेश विरुध्द मुद्दाम हरणार; पाकिस्तानच्या माजी खेळाडूचा आरोप

By

Published : Jun 26, 2019, 8:32 PM IST

कराची - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धा रंगतदार स्थितीत पोहोचली आहे. कोणता संघ उपांत्य फेरी गाठणार यावर चर्चा रंगली आहे. असे असताना पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बासित अली यांनी एक धक्कादायक विधान केले आहे. ते म्हणतात की, पाकिस्तानचा संघ उपांत्य फेरी गाठू नये, यासाठी भारत मुद्दाम श्रीलंका आणि बांगलादेश विरुध्दचे सामने हरणार असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट बासित अली यांनी केला आहे.

विश्वकरंडक स्पर्धेमध्ये भारतीय संघ जवळपास उपांत्य फेरीच्या वाटेवर आहे. भारताने या स्पर्धेत आत्तापर्यत एकही पराभव न स्वीकारता ५ सामन्यापैकी ४ सामन्यात विजय तर एक सामना पावसाअभावी होऊ शकलेला नाही. भारताचा पुढील सामना वेस्ट इंडिज विरुध्द होणार आहे. त्यानंतर भारत श्रीलंका, बांगलादेश आणि इंग्लड विरुध्द खेळणार आहे. पाकिस्तान संघाला उपांत्य फेरी गाठण्यासाठी न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि बांगलादेश विरुध्द विजय मिळवावा लागणार आहे.

अली यांनी एका वृत्तावाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियाचा संघ मुद्दामहून भारताविरुद्धचा सामना हरला. एवढेच नाही तर १९९२ च्या विश्वकरंडकामध्येही न्यूझीलंडचा संघ जाणून बुजून उपांत्य फेरीमध्ये पाकिस्तान विरुद्ध हरला होता. असा गौप्यस्फोट बसीत अली यांनी केल्याने क्रिकेट विश्वात खळबवळजनक उडाली आहे.

खरच बासित अलीच्या बोलण्यात तथ्य आहे का?

भारतीय संघ जर श्रीलंका आणि बांगलादेश विरुध्दच्या सामन्यात हरला. तर याचा फायदा बांगलादेशच्या संघालाच होणार आहे. सद्य स्थितीत पाकिस्तानला न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि श्रीलंका या तिनही संघावर विजय मिळवावा लागणार आहे. तेव्हा पाकिस्तानचे एकूण ११ गुण होतील. तर दुसरीकडे बांगलादेशचे ७ सामने झाले असून बांगलादेश भारत आणि पाकिस्तान विरुध्द खेळणार आहे. सद्य स्थितीत बांगलादेशचे ७ गुण असून यातील दोन्ही सामने जिंकल्यास बांगलादेशचे ११ गुण होतील. दरम्यान, बांगलादेशचा नेटरनरेट पाकिस्तानपेक्षा चांगला असल्याने बांगलादेश उपांत्य फेरी गाठेल. सर्व बाबीचा विचार केला असता, पाकिस्तान विरुध्द बांगलादेश हा सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे. पुढील कोणत्याही सामन्यात पावसाने खोड काढली तर कोण उपांत्य फेरी गाठेल हे सांगता येणार नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details