कराची - विश्वकरंडक स्पर्धेत पाकिस्तान संघाने न्यूझीलंडवर ६ बळी राखून विजय मिळवला. या विजयानंतर पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान अद्याप कायम आहे. पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठण्यासाठी अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्याविरुध्द जिंकावे लागणार आहेत. जरी पाकिस्तान हे दोन्ही सामने जिंकला तरी इंग्लडच्या दोन सामन्यापैकी एका सामन्यात इंग्लड पराभूत होणे गरजेचे आहे. इंग्लडचा संघ भारत आणि न्यूझीलंड विरुध्द खेळणार आहे. यामुळे पाकचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने भारताने इंग्लडला हरवून पाकिस्तानची मदत करावी, अशी विनंती भारतीय संघाला केली आहे.
इंग्लडचा पराभव करुन पाकिस्तानला मदत करा; पाकच्या 'या' खेळाडूची भारतीय संघाला विनंती - indian team
विश्वकरंडक स्पर्धेत पाकिस्तान संघाने न्यूझीलंडवर ६ बळी राखून विजय मिळवला. या विजयानंतर पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान अद्याप कायम आहे. पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठण्यासाठी अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्याविरुध्द जिंकावे लागणार आहेत. जरी पाकिस्तान हे दोन्ही सामने जिंकला तरी इंग्लडच्या दोन सामन्यापैकी एक सामन्यात इंग्लड पराभूत होणे गरजेचे आहे. इंग्लडचा संघ भारत आणि न्यूझीलंड विरुध्द खेळणार आहे. यामुळे पाकचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने भारताने इंग्लडला हरवून पाकिस्तानची मदत करावी, अशी विनंती भारतीय संघाला केली आहे.
विश्वकरंडक स्पर्धेत पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. वेस्ट इंडिजकडून पराभव झाला त्यानंतर भारताविरुध्दच्या सामन्यातही पाकिस्तानला पराभूत व्हावे लागले. यामुळे सरफराजच्या संघाला ट्रोल करण्यात आले. मात्र, भारताविरुध्दच्या सामन्यानंतर पाकिस्तानने सकारात्मक खेळ करत दक्षिण आफ्रिका आणि या स्पर्धेत अजेय असलेल्या न्यूझीलंडचा पराभव केला. पाकिस्तानच्या संघाला उपांत्य फेरी गाठण्यासाठी राहिलेल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. तसेच दोन सामन्यात इंग्लडचा एक पराभव पाकिस्तानसाठी आवश्यक आहे.
याकारणाने शोएब अख्तरने इंग्लडला हरवून आमच्या संघाला मदत करा, अशी विनंती भारतीय संघाला केली आहे. भारतीय संघ जवळपास उपांत्य फेरी गाठल्यातच जमा आहे. तर उलट पाकिस्तानचा संघ 'जर-तर'च्या काठेवर आहे. भारताने जर इंग्लडचा पराभव केला आणि गुणांची समीकरणे जुळली तर क्रिकेटरसिकांना भारत विरुध्द पाकिस्तान सामना उपांत्य फेरीत पाहायला मिळू शकतो.