कराची - चीनमध्ये सुरुवात झालेल्या कोरोना विषाणूने जगभरासह पाकिस्तानमध्येही वेगाने हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत पाकिस्तानमध्ये ८०० हून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर ६ जणांचा या विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाचा वाढता प्रसार पाहून पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने चिंता व्यक्त केली आहे.
शोएब म्हणतो की, 'प्रत्येकानं सावधान राहिलं पाहिजे. पण कित्येक जण घोळका करून मौजमजा करताना दिसत आहे. सद्य परिस्थिती पाहता लोकांनी स्वत:ला लॉकडाऊन केलं पाहिजे. याबाबत पाकिस्तानच्या लोकांना भारतीय लोकांकडून शिकलं पाहिजे. ते स्वत: लॉकडाऊन करत आहेत.'
पाकिस्तानी रात्रभर १० वाजेपर्यंत हॉटेल्समध्ये फिरताना दिसत आहेत. एकदुसऱ्यांना मेजवानी देत आहेत. मी तर म्हणतो की, पाकिस्तानचा पंजाब प्रांतमध्ये कर्फ्यू लावला पाहिजे. बांगलादेश आणि रवांडा सारखे देश कोरोनाचा सामना चांगला करत आहेत. पण पाकिस्तानच्या लोकांना कशाचीही भीती नसल्यासारखे मौजमजा करताना दिसत आहेत, असेही शोएब म्हणाला.