मुंबई- सर्वोच्च न्यायालयाने गठीत केलेल्या समितीचे प्रमुख विनोद राय यांनी स्पष्ट केले, की आतंकवादाला पोसणाऱ्यादेशांवर प्रतिबंध लावण्यात यावा, अशीच बीसीसीआयची भूमिका आहे. बीसीसीआयने आयसीसीकडे अशी मागणी करताना पाकिस्तानचा उल्लेख केला नव्हता.
आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानवर प्रतिबंध घालण्यात यावा हीच आमची इच्छा - विनोद राय - सुरक्षा
विनोद राय यांनी स्पष्ट केले, की आतंकवादाला पोसणाऱ्या देशांवर प्रतिबंध लावण्यात यावा, अशीच बीसीसीआयची भूमिका आहे.
आयसीसीची गेल्या आठवड्यात बैठक झाली होती. आतंकवादाला पोसणाऱ्या देशासोबत संबंध संपुष्टात आणण्याचा बीसीसीआयच्या आग्रहाला आयसीसीने नकार दिला होता. भारत पाकिस्तान यांच्यात १६ जूनला विश्वकरंडकात सामना होणार आहे. या सामन्यावर बहिष्कार टाकण्याबाबत विनोद राय म्हणाले, पुलवामा हल्ल्याला लक्षात घेता या महत्वपूर्ण सामन्यावर बहिष्कार टाकण्याआधी योग्य प्रक्रिया राबवली जाईल.
विनोद राय म्हणाले, भारत-पाक सामन्यासाठी अजून ४ महिने बाकी आहेत. आम्ही विश्वकरंडकातील सुरक्षेबद्दल आयसीसीकडे चिंता व्यक्त केली आहे. आयसीसीने सुरक्षा व्यवस्था कडक करण्याची हमी दिली आहे. आयसीसीने अजूनही पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून प्रतिबंधित करण्याच्या भारताच्या आग्रहाला नाकारले नाही. याबाबतचे पत्र आयसीसीसमोर ठेवण्यात आले आहे. ही एक प्रक्रिया असून हळू-हळू पुढे जाणार आहे. याची सुरुवात आम्ही केली आहे.