कराची- विश्वकरंडक स्पर्धेमध्ये पाकिस्तानच्या संघाला उपांत्य फेरी गाठता आली नाही. यामुळे स्पर्धेनंतर संघात अनेक बदल करण्यात येतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. त्या बदलांच्या दृष्टीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. पहिला बदल म्हणून बोर्डाने, पाकिस्तानी खेळाडूंच्या फिटनेसबाबत नियमावली तयार केली आहे. यामध्ये यापुढे खेळाडूंना बिर्याणी खाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
भारत विरुध्द पाकिस्तानच्या सामन्यात पाकिस्तानी कर्णधार सरफराज अहमद मैदानात अनेक वेळा जांभई देताना दिसून आला. सरफराजची अनेक फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला. त्यानंतर तर पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने तर सरफराजचा चांगलाच समाचार घेतला. त्याने असा पोट सुटलेला कर्णधार मी कधी पाहिला नाही, अशी टीका त्यांनी केली.