नवी दिल्ली -पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने कसोटी क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती जाहीर केली होती. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेटला अजून एका मोठ्या धक्क्याला सामोरे जावे लागले आहे. सूत्रांच्या मते, डावखूरा वेगवान गोलंदाज वहाब रियाजनेही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
पाकिस्तानच्या एका वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार रियाजने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला तसे कळवले आहे. रियाज सध्या कॅनडाच्या टी-२० क्रिकेटमध्ये खेळत असून पाकिस्तानमध्ये परतल्यावर तो निवृत्तीची अधिकृत घोषणा करु शकतो.