नवी दिल्ली -टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या कालावधीमध्ये टीम इंडियावर अतिरेक्यांचा हल्ला होऊ शकतो, अशी धक्कादायक माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) दिली आहे.
मीडियासंस्थेच्या वृत्तानुसार, पीसीबीला या हल्लाच्या धमकीचा ई-मेल मिळाला आहे. या मेलमध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियावर अतिरेक्यांचा हल्ला होऊ शकतो, असे म्हटले आहे. हा मेल पीसीबीने आयसीसीला आणि बीसीसीआयला पाठवला आहे.