महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

ACC Emerging Cup Semi-Final : चुरसीच्या सामन्यात पाकिस्तानची भारतावर मात

नाणेफेक जिंकून पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा सलामीवीर ओमर युसूफ आणि हैदर अली यांनी पाकला चांगली सुरुवात करुन दिली. त्यानंतर सैद बदर, कर्णधार रोहिल नाझीर आणि इम्रान रफीक यांनीही अखेरच्या फळीत मोलाच्या धावा जोडल्या. पाकने निर्धारीत ५० षटकात ७ बाद २६७ धावा केल्या. भारताकडून शिवम मवी, हृतिक शौकीन आणि सौरभ दुबे यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले.

ACC Emerging Cup Semi-Final : रोमांचक सामन्यात पाकिस्तानची भारतावर मात

By

Published : Nov 20, 2019, 8:11 PM IST

Updated : Nov 20, 2019, 8:23 PM IST

ढाका- अत्यंत चुरशीच्या सामन्यात पाकिस्तानने भारतीय संघाचा ३ धावांनी पराभव करत इमर्जिंग अशियाई चषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत ७ बाद २६७ धावा केल्या होत्या. पण भारताचा २३ वर्षाखालील संघ निर्धारीत ५० षटकात ८ गडी बाद २६४ धावा करु शकला.

नाणेफेक जिंकून पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा सलामीवीर ओमर युसूफ आणि हैदर अली यांनी पाकला चांगली सुरुवात करुन दिली. त्यानंतर सैद बदर, कर्णधार रोहिल नाझीर आणि इम्रान रफीक यांनीही अखेरच्या फळीत मोलाच्या धावा जोडल्या. पाकने निर्धारीत ५० षटकात ७ बाद २६७ धावा केल्या. भारताकडून शिवम मवी, हृतिक शौकीन आणि सौरभ दुबे यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले.

प्रत्युत्तरादाखल भारतीय सलामीवीरानी आश्वासक सुरुवात करुन दिली. कर्णधार बेलुर रवी शरथ आणि आर्यन जुन्याल यांनी पहिल्या गड्यासाठी ४३ धावांची भागीदारी केली.

जुन्याल माघारी परतल्यानंतर कर्णधार शरथने सनवीर सिंहच्या साथीने चांगली लढत दिली. मात्र हे दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर भारतीय डावाला गळती लागली. भारतीय संघाला शेवटच्या तीन षटकात २० धावांची गरज होती. तेव्हा भारताचे ४ गडी शिल्लक होते. मात्र, भारतीय संघ निर्धारीत ५० षटकात २६४ धावा करु शकला.

सनवीर सिंह (७६), कर्णधार शरथ (४९), अरमान जाफर (४६) आणि चिन्मय सुतार (२८) यांचे प्रयत्न अपुरे पडले. पाकिस्तानकडून मोहम्मद हसनैन आणि सैफ बदर यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले. तर अमद बट आणि उमेर खान यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केले. अखेरच्या षटकात भारताला विजयासाठी ७ धावांची गरज होती, मात्र पाकच्या अमाद बटने केवळ ४ धावा देत पाकिस्ताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

Last Updated : Nov 20, 2019, 8:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details