मुंबई -आजपासून बरोबर 30 वर्षांपूर्वी 15 नोव्हेंबर 1989 रोजी, एकाच कसोटी सामन्यात दोन युवा खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आणि त्यानंतरच्या काळात या खेळाडूंनी क्रिकेटमध्ये आपली सत्ता गाजवली. या खेळाडूंपैकी एक म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि दुसरा म्हणजे पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वकार यूनुस.
हेही वाचा -१४ वर्षाच्या ईशा सिंगचा पराक्रम, आशियाई नेमबाजी स्पर्धेत जिंकली ३ सुवर्णपदके
1989 मध्ये कराची येथे भारत विरुद्ध पाकिस्तान कसोटी सामन्यात सचिन तेंडुलकर आणि वकार युनूसने पदार्पण केले होते. अत्यंत रोमहर्षक झालेली ही कसोटी अनिर्णित राहिली होती. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने इम्रान खानच्या शतकी खेळीच्या जोरावर 409 धावांची नोंद केली होती. प्रत्युत्तरादाखल भारत 262 धावांवर सर्वबाद झाला. वकारने पहिल्या डावात सचिनला 15 धावांवर बाद केले होते.