VIDEO - आजच्याच दिवशीच गिब्जने लगावले होते सलग ६ षटकार
गिब्जने नेदरलँडचा गोलंदाज डीएलएल वेन बंजच्या एका षटकात सलग ६ षटकार लगावले होते
Herschelle Gibbs
नवी दिल्ली - आजच्याच दिवशी म्हणजे १६ मार्च २००७ रोजी दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज हर्षल गिब्जने विश्वचषक स्पर्धेत सलग ६ चेंडूत ६ षटकार ठोकण्याचा विश्वविक्रम केला होता. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये, अशी कामगिरी करणार गिब्ज हा पहिलाच खेळाडू ठरला होता.
वेस्टइंडिज येथे खेळल्या गेलेल्या २००७ च्या विश्वचषक स्पर्धेत गिब्जने नेदरलँडविरुद्ध हा विक्रम केला होता. गिब्जने नेदरलँडचा गोलंदाज डीएलएल वेन बंजच्या एका षटकात सलग ६ षटकार लगावले होते. या सामन्यात गिब्जने ४० चेंडूत ७२ धावांची खेळी केली होती. तसेच दक्षिण आफ्रिकेने हा सामना तब्बल २२१ धावांनी जिंकला होता.
यानंतर ६ महिन्यांनी युवराज सिंगने टि-२० क्रिकेट विश्वचषकात इंग्लंडच्या स्टुअर्ड ब्रॉडच्या गोलंदाजीवर सलग ६ गगनचुंबी षटकार ठोकले होते. याच सामन्यात त्याने टि-२० क्रिकेट विश्वातील सर्वात जलद अर्धशतक अवघ्या १२ चेंडूत ठोकण्याचा पराक्रमही केला होता.