कोलंबो - न्यूझीलंडने श्रीलंका दौऱ्यातील टी-२० मालिकेसाठी कर्णधार केन विल्यमसनला विश्रांती दिली असून त्याच्या ठिकाणी संघाचे नेतृत्व टीम साऊदीकडे दिले आहे. तसेच अनुभवी गोलंदाज ट्रेंट बोल्टलाही विश्रांती देण्यात आली आहे. यष्टिरक्षक टीम सेइफर्ट हा दुखापतीतून सावरला असून त्याचे संघात पुनरागमन झाले आहे.
न्यूझीलंड निवड समितीने सांगितले की, 'केन आणि ट्रेंट यांनी विश्वकरंडक स्पर्धेत संघासाठी महत्वपूर्ण योगदान दिले. त्यांना आता पुरेशी विश्रांती मिळण्याची आवश्यकता आहे. यामुळे निवड समितीने श्रीलंकेविरुध्द होणाऱ्या टी-२० मालिकेत त्यांनी विश्रांती दिली आहे.'