नवी दिल्ली- वेस्ट इंडीजचा अष्टपैलू क्रिकेटपटू निकोलस पूरनवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) चेंडू कुरतडल्याप्रकरणी चार सामन्यांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. पूरनने अफगाणिस्तानकिरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान चेंडू कुरतडला होता. हे कृत्य आचारसंहिता क्रमांक तीनचे उल्लंघन करणारे आहे. यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
लखनऊ येथे झालेल्या अफगाणिस्तान विरुध्द तिसऱ्या सामन्यात पूरनने चेंडूचा मूळ आकार कृत्रिम पद्धतीने बदलण्याचा प्रयत्न केला. पूरनच्या या कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. तेव्हा आयसीसीने या प्रकरणाची सखोल तपासणी केली. त्यात पूरन चेंडूला अंगठय़ाच्या नखाने ओरखाडे ओढून चेंडूची चमक घालविण्याचा प्रयत्न करताना दिसून आला. यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली.