महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

न्यूझीलंडचा दिग्गज फिरकीपटू डॅनियल व्हेट्टोरीची जर्सी झाली निवृत्त - number 11

व्हेट्टोरीने २९१ एकदिवसीय सामन्यात ३०५ बळी घेतले आहेत.

न्यूझीलंडचा दिग्गज फिरकीपटू व्हेट्टोरीची जर्सी झाली निवृत्त

By

Published : Aug 5, 2019, 10:36 PM IST

नवी दिल्ली -न्यूझीलंडचा दिग्गज फिरकीपटू आणि माजी कर्णधार डॅनियल व्हेट्टोरीची जर्सी निवृत्त झाली आहे. न्यूझीलंड क्रिकेटने सोमवारी यांसंबंधी माहिती दिली. व्हेट्टोरीची ११ क्रमांकाची जर्सी निवृत्त झाली आहे.

श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी न्यूझीलंड क्रिकेटने आपल्या खेळा़डूंच्या जर्सीबद्दल घोषणा केली. त्यानिमित्ताने व्हेट्टोरीच्या जर्सीच्या निवृत्तीचीही माहिती देण्यात आली. न्यूझीलंड क्रिकेटने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, 'ज्या खेळाडूंनी न्यूझीलंडसाठी २०० सामन्यांमध्ये प्रतिनिधीत्व केले आहे, त्यांची जर्सी निवृत्त केली जाईल.' व्हेट्टोरीने २९१ एकदिवसीय सामन्यात ३०५ बळी घेतले आहेत. २००७ ते २०११ पर्यंत तो न्यूझीलंड संघाचा कर्णधार होता.

काही दिवसांपूर्वी, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आपल्या क्रिकेट संघासाठी नवीन प्रशिक्षकाची घोषणा केली. न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि आयपीएलच्या दिल्ली आणि बंगळुरु संघाकडून खेळलेला डॅनियल व्हेट्टोरी आता बांग्लादेशच्या फिरकीपटूंना प्रशिक्षण देणार आहे.

डॅनियल व्हेट्टोरी बांगलादेशसाठी १०० दिवस प्रशिक्षक म्हणून काम करेल. २०२० मध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वकरंकासाठीही तो प्रशिक्षक म्हणून काम करणार आहे. २०१५ मध्ये व्हेट्टोरी निवृत्त झाला होता. त्यानंतर त्याने आयपीएलमध्ये बंगळुरु संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details