महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

टीम इंडियाचा 2020 मधील न्यूझीलंड दौरा घोषित, जाणून घ्या वेळापत्रक

भारतीय संघ येणाऱ्या जानेवारीमध्ये न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे.

भारत जाणार न्यूझीलंड दौऱ्यावर

By

Published : Jun 7, 2019, 4:42 PM IST

नवी दिल्ली -क्रिकेटच्या विश्वकरंडक स्पर्धेला नुकतीच सुरुवात झाली आहे. अशातच न्यूझीलंडने त्यांचे 2019-20 या वर्षीच्या सामन्यांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये भारतीय संघाचा न्यूझीलंड दौरा सामाविष्ट करण्यात आला आहे. भारतीय संघ येणाऱ्या जानेवारीमध्ये न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे.

भारतीय संघ या न्यूझीलंड दौऱ्यात 5 टी-20 सामने, 3 वनडे आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे. भारत 24 जानेवारीला पहिला टी-20 सामना खेळेल तर दौऱ्याचा शेवट कसोटी मालिकेने होईल.

भारताच्या न्यूझीलंड दौऱ्याचे वेळापत्रक -
टी20 मालिका –

  • 24 जानेवारी – पहिला टी20 सामना – इडन पार्क, ऑकलंड
  • 26 जानेवारी – दुसरा टी20 सामना – इडन पार्क, ऑकलंड
  • 29 जानेवारी – तिसरा टी20 सामना – सेडन पार्क, हॅमिल्टन
  • 31 जानेवारी – चौथा टी20 सामना – वेस्टपॅक स्टेडियम, वेलिंग्टन
  • 2 फेब्रुवारी – पाचवा टी20 सामना – बे ओव्हल, तौरंगा

वनडे मालिका –

  • 5 फेब्रुवारी – पहिला वनडे – सेडन पार्क, हॅमिल्टन
  • 8 फेब्रुवारी – दुसरा वनडे – इडन पार्क, ऑकलंड
  • 11 फेब्रुवारी – तिसरा वनडे – बे ओव्हल, तौरंगा

कसोटी मालिका –

  • 21 – 25 फेब्रुवारी – पहिली कसोटी – बासिन रिसर्व, वेलिंग्टन
  • 29 – 4 मार्च फेब्रुवारी – दुसरी कसोटी – हॅगली ओव्हल, ख्राईस्टचर्च

ABOUT THE AUTHOR

...view details