लंडन- आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सेमीफायनलच्या सामन्यात न्यूझीलंडने भारतीय संघाला पराभूत करुन घरचा रस्ता दाखवला. त्यावेळी भारतीय संघाची स्पर्धेतील कामगिरी पाहता सर्वांना असे वाटले होते की, भारत सहज अंतिम सामन्यात पोहोचेल. त्यामुळे इंग्लंडसह जगभरातील हजारो भारतीयांनी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याची तिकीटे खरेदी केली होती. मात्र, भारत अंतिम सामना खेळणार नसल्यामुळे भारतीयांना या सामन्याबाबत कोणतीही उत्सुकता राहिलेली नाही.
'फायनल सामना पाहायचा नसेल तर तिकीटे विका', न्यूझीलंडच्या खेळाडूचे भारतीयांना आवाहन
भारतीयांना आता फायनल सामन्यात कोणताही इंटरेस्ट नसल्यामुळे न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू जिमी नीशम याने भारतीय चाहत्यांना एक सल्ला दिला आहे.
आता भारतीयांना या सामन्यात कोणताही इंटरेस्ट नसल्यामुळे न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू जिमी नीशम याने भारतीय चाहत्यांना एक सल्ला दिला आहे. निशमने भारतीय चाहत्यांना आवाहन केले आहे की, जर तुम्हाला अंतिम सामना पाहायचा नसेल तर, तुम्ही सामन्याची तिकीटे विका. त्यामुळे आमच्या आणि इंग्लंडच्या जास्तीत जास्त चाहत्यांना सामना पाहायला मिळेल, अशा आशयाचे निशमने ट्वीट केले आहे.
निशमने त्याच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये निशमने भारतीय चाहत्यांना तिकिटे विकण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे ज्यांना हा सामना पाहायचा आहे, त्या लोकांना या सामन्याची तिकीटे मिळतील, असे निशमने सुचवले आहे.