टौंटन - शनिवारी खेळल्या गेलेल्या विश्वचषकातील सामन्यात न्यूझीलंडने अफगानिस्तावर ७ गड्यांनी विजय मिळवला. या विजयाबरोबर न्यूझीलंडने गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखले आहे. न्यूझीलंडने अफगानिस्तानला 172 धावात गुंडाळले होते.
आयसीसी वर्ल्ड कप 2019 : न्यूझीलंडचा अफगानिस्तावर 7 गड्यांनी विजय, न्यूझीलंड गुणतालिकेत अव्वल - Victory
शनिवारी खेळल्या गेलेल्या विश्वचषकातील सामन्यात न्यूझीलंडने अफगानिस्तावर ७ गड्यांनी विजय मिळवला. या विजयाबरोबर न्यूझीलंडने गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखले आहे.
केन विलियम्सन आणि रॉस टेलर या अनुभवी खेळाडूंनी न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. जिमी निशॅम आणि लॉकी फर्ग्युसन यांच्या भेदक माऱ्यासमोर अफगाणिस्तान संघाने शरणागती पत्करली. वर्ल्डकप स्पर्धेतील शनिवारच्या दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने अफगाणिस्तान संघाला 172 धावांत गुंडाळले. निशॅमने 31 धावा देत पाच विकेट घेत न्यूझीलंडच्या दिग्गज गोलंदाजांच्या पंक्तित स्थान पटकावले. वर्ल्ड कप स्पर्धेत एका सामन्यात पाच विकेट घेणारा तो न्यूझीलंडचा पाचवा गोलंदाज ठरला. निशॅमला फर्ग्युसनची तोडीस तोड साथ लाभली. फर्ग्युसनने 4 विकेट घेतल्या.
अफगाणिस्तानकडून हझरत झाझल (34), नूर अली झाद्रान ( 31), हशमदुल्लाह शाहीदी (59) यांनीच समाधानकारक कामगिरी केली. बिनबाद 60 धावांवरून अफगाणिस्तानची अवस्था 4 बाद 70 अशी दयनीय झाली होती. अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ 172 धावांत तंबूत पाठवले.