हॅमिल्टन - न्यूझीलंड संघाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताला ४ गडी राखून मात दिली. नाणेफेक गमावल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी केली आणि ५० षटकात ४ बाद ३४७ धावा स्कोर बोर्डवर लावल्या. भारताचे हे आव्हान न्यूझीलंडने ४८.१ षटकात ६ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. दरम्यान, या सामन्यानंतर भारताचा माजी स्फोटक सलामीवीर विरेंद्र सेहवाग आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांनी न्यूझीलंडला विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
भारताचा चौथ्या फलंदाज श्रेयस अय्यरने (१०३) आपल्या कारकिर्दीतील पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. त्याला कर्णधार विराट कोहली (५१) आणि केएल राहुलने (नाबाद ८८)चांगली साथ दिली. या त्रिमुर्तीच्या खेळीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडसमोर विजयासाठी ३४८ धावाचे लक्ष्य ठेवले.