महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

विश्वचषकासाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या एका खेळाडूला संघात स्थान - Men’s Cricket World Cup

न्यूझीलंड संघाचे नेतृत्व केन विल्यमसनकडे देण्यात आले आहे

विश्वचषकासाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर

By

Published : Apr 3, 2019, 12:50 PM IST

Updated : Apr 4, 2019, 1:48 AM IST

वेलिंग्टन -आगामी आयसीसी एकदिवसीय विश्वचषकासाठी न्यूझीलंड क्रिकेट मंडळाकडून १५ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली. या संघाचे नेतृत्व दिग्गज आणि अनुभवी खेळाडू केन विल्यमसनकडे देण्यात आले आहे. या सघांतील निम्म्यापैकी जास्त खेळाडू हे पहिल्यांदा विश्वचषकात न्यूझीलंड संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

विश्वचषकासाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर


विश्वचषकासाठी संघ घोषित करणारा न्यूझीलंड हा पहिला देश ठरला आहे. या संघात भारतीय वंशाचा खेळाडू ईश सोधीला स्थान देण्यात आले आहे. आगामी विश्वचषक स्पर्धा ३० मेपासून इंग्लंड आणि वेल्समध्ये खेळण्यात येणार आहे.


३० मेला दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्या सामन्यापासून विश्वचषकाची सुरुवात होणार आहे. तर स्पर्धेचा अंतिम सामना १४ जुलैला लॉर्डसवर खेळण्यात येणार आहे.


असा आहे विश्वचषक स्पर्धेसाठी न्यूझीलंडचा १५ सदस्यीय संघ


केन विल्यमसन (कर्णधार), मार्टिन गुप्टील, रॉस टेलर, ट्रेंट बोल्ट, डी ग्रँडहोमे, लॉकी फर्ग्यूसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), कॉलिन मुनरो, जिमी निशाम, हेन्री निकोलस, मिशेल सँटेनर, ईश सोधी, टीम साऊदी, टॉम ब्लंडेल.

Last Updated : Apr 4, 2019, 1:48 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details