मुंबई -आयसीसी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर टीम इंडिया आता वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेसाठी रवाना होणार आहे. टीम इंडिया विंडीज दौऱ्यावर दोन कसोटी व प्रत्येकी तीन एकदिवसीय व टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यापैकी एकदिवसीय आणि ट्वेंटी-20 संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी नवीन खेळाडूंना टीम इंडियात स्थान दिले जाण्याची शक्यता आहे. ही संघनिवड 19 जुलैला होणार आहे.
विंडिजविरुद्ध मालिकेसाठी नवीन खेळाडूंची टीम इंडियात वर्णी?
संघनिवड 19 जुलैला होणार आहे.
विंडीजविरुद्धच्या मालिकेत कर्णधार विराट कोहली आणि प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांना विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. शिवाय, निवृत्तीच्या अफवांमुळे धोनीच्या संघात निवडीबाबत प्रश्नचिन्ह कायम आहेत. याविषयी कोहली आणि बीसीआयने अजूनही स्पष्टीकरण दिलेले नाही.
विंडीजविरुद्ध 3 ते 8 ऑगस्ट या कालावधीत टी-20 मालिका होईल. त्यानंतर 8 ते 14 ऑगस्ट या कालावधीत तीन एकदिवसीय आणि 22 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या कालावधीत दोन कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत.