महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

आयपीएलच्या संघांत वाढ होण्याची शक्यता..अदानी, गोएंका आणि टाटा यांच्यात चढाओढ - new teams of ipl

टाटा उद्योगसमुह, गोएंका उद्योग समुह आणि अदानी उद्योग समुह यांच्यात आायपीएलचे नवीन संघ विकत घेण्यामध्ये चढाओढ सुरु आहे.

आयपीएलच्या संघांत वाढ होण्याची शक्यता..अदानी, गोएंका आणि टाटा यांच्यात चढाओढ

By

Published : Jul 14, 2019, 4:35 PM IST

मुंबई - क्रिकेटच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या आयपीएल स्पर्धेत मोठा बदल घडण्याची शक्यता आहे. भविष्यकाळात इंडियन प्रिमीअर लिग स्पर्धेत 8 संघांऐवजी 10 संघ खेळताना दिसण्याची शक्यता आहे.

एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार टाटा उद्योगसमुह, गोएंका उद्योग समुह आणि अदानी उद्योग समुह यांच्यात आायपीएलचे नवीन संघ विकत घेण्यामध्ये चढाओढ सुरु आहे. या नवीन संघांमध्ये अहमहदाबाद, पुणे आणि जमशेदपूर किंवा रांची यांचा समावेश होणार आहे.

टाटा उद्योग समुह रांची किंवा जमशेदपूर, अदानी उद्योग समुह अहमदाबाद तर गोएंका उद्योग समुह पुणे संघासाठी बोली लावणार असल्याचे समजत आहे. मात्र आयपीएल काऊन्सिल आणि बीसीसीआय यापैकी दोन संघांनाच होकार देऊ शकणार आहे.

बीसीसीआयने 2010च्या आयपीएलमध्ये 10 संघाचा पर्याय निवडला होता. पण, त्यानंतर तो रद्द करण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details