मेलबर्न - डावखुरा वेगवान गोलंदाज नील वॅगनर कसोटी सामन्यात न्यूझीलंडकडून २०० बळी घेणारा दुसरा वेगवान गोलंदाज ठरला. वॅगनरने मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (एमसीजी) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात या विक्रमाला गवसणी घातली. या यादीमध्ये वॅगनरपुढे न्यूझीलंडचे दिग्गज क्रिकेटपटू रिचर्ड हेडली आहेत.
हेही वाचा -ऑलिम्पिक पात्रता : निखतवर मेरी कोम ठरली भारी, ९-१ ने केला पराभव
ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज आणि सध्या स्वप्नवत क्रिकेट खेळत असलेल्या स्टीव्ह स्मिथला माघारी पाठवत वॅगनरने ही कामगिरी केली. हेडली यांनी ४४ कसोटींमध्ये तर, वॅगनरने ४६ व्या कसोटीत २०० बळी घेत ही कामगिरी नोंदवली आहे.
वॅगनरच्या मागे ट्रेंट बोल्ट असून, त्याने ५२ सामन्यात २०० बळी घेतले आहेत. टीम साऊदी आणि ख्रिस केर्न्स यांनी अनुक्रमे ५६ आणि ५८ हा पराक्रम केला. याव्यतिरिक्त वेगवान २०० बळी घेणारा वॅगनर जगातील दुसरा वेगवान डावखुरा गोलंदाज ठरला. त्याच्याआधी भारताच्या रवींद्र जडेजानेही ४४ सामन्यांत २०० बळी घेतले आहेत.