चेन्नई -भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे (बीसीसीआय) माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या मुलीकडे क्रिकेटमधील एक महत्वाचे पद सोपवण्यात येणार आहे. रुपा गुरुनाथ या आता तमिळनाडू क्रिकेट असोसिएशनच्या (टीएनसीए) अध्यक्ष होणार आहेत.
हेही वाचा -India vs South Africa : मालिका विजयाचे स्वप्न भंगले, आफ्रिकेचा भारतावर ९ गडी राखून विजय
येत्या २६ सप्टेंबरला टीएनसीएच्या होणाऱ्या वार्षिक सभेत हा अध्यक्षपदाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या एका मान्यताप्राप्त असोसिएशनच्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच एका महिलेला स्थान दिले जाणार आहे. २४ सप्टेंबरपर्यंत अध्यक्षपदाचा अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे.
टीएनसीएच्या विविध जागांसाठी नियुक्ती केल्या जाणार आहेत. त्यासाठी अनेक नावे चर्चेतही आहेत. त्यामध्ये आर. एस. रामास्वामी (उपाध्यक्ष), के. ए. शंकर (संयुक्त सचिव) आणि जे. पार्थसारथी (कोषाध्यक्ष) यांच्या नावाचा समावेश आहे.
सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी बीसीसीआयचे माजी सचिव निरंजन शाह यांचा मुलगा जयदेव शाह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.