महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Syed Mushtaq Ali Trophy : मुंबईचा विदर्भावर ६ गडी राखून विजय

मुंबईसाठी सलामीवीर जय बिस्ताने केली नाबाद ७३ धावांची अर्धशतकी खेळी

संग्रहीत छायाचित्र

By

Published : Mar 11, 2019, 11:43 PM IST

इंदूर - भारतात सध्या चालू असलेल्या सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात मुंबईने विदर्भावर ६ गडी राखून विजय मिळवला आहे. यापूर्वी झालेल्या सामन्यात मुंबईने दिल्लीवर ८ गडी राखून मात केली होती. हा सामना इंदूर येथील होळकर क्रिकेट मैदान येथे खेळला गेला.

या सामन्यात मुंबईच्या संघाने नाणेपफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. विदर्भाच्या संघाला पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारीत २० षटकांमध्ये ८ गड्यांच्या मोबदल्यात १३७ धावा करत्या आल्या. मुंबईकडून तुषार देशपांडेने विदर्भाला सुरुवातीलाच मोठे धक्के देत ३ विकेट घेतले. तर शार्दुल ठाकूरने २ आणि शम्स मुलानी, शिवम दुबे, सिद्धेश लाड यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला,

विदर्भाने दिलेल्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने १६ व्या षटकांत ६ गडी राखून दणदणीत विजय साजरा केला. मुंबईसाठी सलामीवीर जय बिस्ताने सर्वाधिक नाबाद ७३ धावांची अर्धशतकी खेळी साकारली. तर कर्णधार श्रेयस अय्यरने २८ तर सूर्यकुमार यादव २५ धावा करत जयला चांगली साथ दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details